Source of Article : Sangli Sanvad
भारत देश म्हणजे धर्मशाळा झाला आहे असे म्हटले जाते. ते सत्य असल्याचे वारंवार प्रत्ययास येत असते. देशात प्रचंड संख्येने बांगलादेशी नागरिक घुसले आहेत. हे वास्तव आता शासनाने स्विकारले आहे. परंतु एकगठ्ठा मतांच्या लालसेपोटी सत्ताधारी या बांगलादेशी नागरिकांच्या अंगाला हात लावू इच्छित नाही. केवळ लांबून इशारे द्यायचे आणि प्रत्यक्षात काहीही करायचे नाही हा मुर्खपणा खुलेआम सुरु असतो. आणि बहुसंख्य जनता देखिल त्याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानते. आज या बांगलादेशी मतांची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात देशाची आणखी एक फाळणी झाली तर नवल वाटायचे कारण नाही.
आता तर केंद्रिय गृहमंत्रालयातील विदेशी विभागातील अवर सचिव विकास श्रीवास्तव यांनी तर कमालच केली आहे. त्यांनी हायकोर्टात चक्क शपथपत्र दाखल केले आहे. त्यात म्हटले आहे की, बांगलादेशी नागरिकांची देशात मोठ्या प्रमाणात घुसखोर होत आहे. आर्थिक, राजकीय व इतर कारणांनी स्थलांतरित झालेल्या बांगलादेशींना हुडकून काढणे अत्यंत कठीण आहे. त्याचप्रमाणे देशात किती बांगलादेशी अवैधरित्या वास्तव्य करीत आहेत याची नेमकी माहिती देता येणार नाही.
आता याला काय म्हणावे? मायबाप शासनच जर उघडपणे बांगलादेशी नागरिकांची बाजू घेणार असेल तर त्या सरकारला काय अर्थ आहे? आपल्या घरात रस्त्यावरील कोणीही राहण्यास आला तर ते आपण सहन करतो का? नाही ना! मग देशात लाखो बांगलादेशी निर्धास्तपणे वास्तव्य करीत आहेत आणि शासन म्हणते त्यांना हुडकून काढणे आम्हाला शक्य नाही. मग तुम्हाला काय शक्य आहे ते तरी सांगा असाच सामान्यांचा सवाल आहे. आज देशातील 50 हून अधिक मतदारसंघ असे आहेत की जेथे अल्पसंख्यक मतांच्या जोरावर जनसेवक निवडून येतात. त्यामध्ये बांगलादेशी नसतील असे आपण म्हणू खात्रीने सांगू शकतो का? मतांच्या लाचारीसाठीच सरकार बांगलादेशी घुसखोरांना लाथ मारुन बाहेर काढण्यास कचरत आहे. जर त्यांना आपण हाकलले तर आपल्याला मुस्लिमांची मते पडतील का? हाच प्रश्न त्यांच्यासमोर आहे. परंतु येथील राष्ट्रवादी मुस्लिमांचा कधीच बांगलादेशी घुसखोरांना पाठिंबा नव्हता आणि नसेल.
आता या बांगलादेशी घुसखोरांना सरकारने गालीचे अंथरले आहेतच. त्याचाच परिपाक म्हणजे देशात दहशवादी कारवाया वाढत चालल्या आहेत. मागील काही दिवसात सरकारने इंडियन मुजाहिदीन या आंतकवादी संघटनेच्या खतरनाक अतिरेक्यांना अटक केली आहे. त्यांना स्थानिकांचे सहकार्य असल्याशिवाय हे शक्य आहे का? घुसखोरांना आश्रय दिल्यावर दुसरे काय होणार? घुसखोरांना हुडकून काढणे अशक्य असल्याचे सांगणार्या सरकारला काहीही वाटत नसले तरी सरकारच्या विचारसरणीची सामान्यांना आज लाज वाटत आहे.
No comments:
Post a Comment