अभाविपच्या प्रदेश कार्यकारणी बैठकीस लातूरमध्ये सुरवात
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रदेश कार्यकारणी बैठकीचे
उद्घाटन प्रदेश अध्यक्ष प्रा. नरेंद्र पाठक व प्रदेश मंत्री श्री. शैलेंद्र
दळवी यांच्या हस्ते झाले.
२ दिवस चालणाऱ्या या बैठकीत अभाविपच्या मागील वर्षाची समीक्षा व
आगामी वर्षाची योजना ठरवण्यात येणार आहेत. तंत्रशिक्षण, विद्यार्थी
साहित्य संमेलन, अशा अनेक विषयांवर चर्चा होणार आहे.
यावेळी बैठकीच्या उद्घाटनपर भाषणात प्रदेश अध्यक्ष प्रा.
नरेंद्र पाठक यांनी अभाविपच्या प्रदेश स्तरावरील कामाचा आढावा घेतला.लातूर
शहरातील विवेकानंद केंद्र व अभाविपच्या कामगिरीची माहितीही प्रदेश
अध्यक्षांनी यावेळी दिली. देशभरात राजकीय व सामाजिक परिवर्तन घडत असताना
युवक हा विकासाचा केंद्रबिंदू राहिला पाहिजे असा आग्रह अभाविपचा असल्याचे
अध्यक्षांनी सांगितले.विद्यार्थी परिषदेने मतदार जागृती नोंदणी अभियान
राबवून देशाच्या परिवर्तनाच्या भूमिकेत महत्वपूर्ण भूमिका निभावून स्थिर
सरकार दिले. आम्हाला राज्य नाही तर समाज बदलायचा आहे, आमचे काम हे
व्यक्तीनिर्मानाचे आहे असे मौलिक विचार त्यांनी यावेळी मांडले.
त्याबरोबरच अभाविपचे पूर्व कार्यकर्ते दिवंगत मा. गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
No comments:
Post a Comment